गोवर्धन पर्वत वाचवा, नाहीतर सरकार यालाही विकून टाकेल; प्रियंका गांधींचा केंद्र सरकारला टोला


मथुरा – मथुरेत काँग्रेसने मंगळवारी शेतकरी महापंचायत केली. केंद्र सरकारवर यात आलेल्या पक्षाच्या महासचिव प्रियंका गांधींनी निशाणा साधला. त्या म्हणाल्या की, मोदी सरकारची विवेकबुद्धी मेली असून भगवान श्रीकृष्ण यांचा अहंकार तोडतील. केंद्र सरकारला टोला लगावताना यावेळी प्रियंका म्हणाल्या की, तुम्ही गोवर्धन वाचवा, नाहीतर सरकार यालाही विकून टाकेल

प्रियंका गांधींनी आपल्या भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी भगवान श्री कृष्ण की जय.. असा जयघोष केला. त्याचबरोबर, कृषी कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांसाठी दोन मिनीटांचे मौन बाळगले. त्यानंतर प्रियंका म्हणाल्या की, सरकारने शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली होती, पण पूर्ण एकही केले नाही. पंतप्रधानांनी स्वतःसाठी दोन विमाने खरेदी केली, पण शेतकऱ्यांचे पैसे दिले नाही.

पुढे प्रियंका म्हणाल्या की, श्रीमंतांना अजून श्रीमंत होण्याचे लायसेंस सरकारने दिले आहे. आता ते साठवण करतील आणि येणाऱ्या काळात MSP पूर्णपणे बंद होईल. पंतप्रधान अहंकारीच नाही, तर भित्रेदेखील आहेत. प्रियंका म्हणाल्या, संसदेत राहुल गांधींनी मृत शेतकऱ्यांसाठी दोन मिनीटांचे मौन धरण्यास सांगितल्यावर एकही भाजप खासदार उभा राहिला नाही.

पुढे प्रियंका गांधी म्हणाल्या की, भाजप सरकारने फक्त श्रीमंतांचे पोट भरले. जोपर्यंत हे काळा कायदे परत घेणार नाहीत, तोपर्यंत आम्ही लढत राहू. आमचे सरकार आल्यावर हे काळे कायदे रद्द करू.