पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर साधला निलेश राणेंनी निशाणा


मुंबई : आज पहिल्यांदाच पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात अडकलेले शिवसेनेचे नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड प्रसारमाध्यमांसमोर आले. आज यवतमाळमधील पोहरादेवी गडावर जाऊन जगदंबामातेचे त्यांनी दर्शन घेतले. त्यांच्या शेकडो समर्थकांनी यावेळी प्रचंड गर्दी केली होती. माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरद्वारे याच मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.


शिवजयंतीला शिवनेरीवर 144 कलम लावणारे ठाकरे सरकारला पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संशयाच्या घेऱ्यात असलेले संजय राठोड अचानक बिळातून बाहेर आले आणि गर्दी करून फिरले. त्यावेळी महाभकास आघाडीला कोरोनाची भिती वाटली नाही. ठाकरे सरकारच्या मंत्र्यांना सगळे माफ आहे, असा घणाघात निलेश राणे यांनी केला.