मुंबई – इंधनाच्या दरासह स्वयंपाकाच्या एलपीजी गॅसच्या दरांचा भडका उडाला असून पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे लॉकडाउन आणि कोरोनामुळे आर्थिक झळ बसलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर बोझा पडला आहे. युवा सेनेने पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून यही है अच्छे दिन? असा सवाल करत मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी सुरू केली आहे.
इंधन दरवाढीच्या विरोधात युवा सेनेची पोस्टरबाजी
देशात गगनाला इंधनाचे दर भिडले आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत. तर डिझेलचे दरही ९० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. सर्वसामान्य नागरिक वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळे जेरीस आल्याचे चित्र असून, त्यात आता स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीने भर घातली आहे.
Mumbai: Yuva Sena, the youth wing of Shiv Sena puts up banners stating 'Yahi hai acche din?' at various petrol pumps and roadside in Bandra West pic.twitter.com/yAqMTacCZS
— ANI (@ANI) February 22, 2021
विरोधक पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून सरकारवर टीका करताना दिसत आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरांवरून शिवसेनेची युथ विंग असलेल्या युवा सेनेने मुंबईतील वांद्रे परिसरात ठिकठिकाणी पोस्टर लावत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
युवा सेनेने वांद्रे परिसरातील रस्त्यांच्या बाजूला आणि पेट्रोल पंपावर छोटे होर्डिंग्ज लावले आहेत. २०१५ आणि २०२१ मधील पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरातील तफावत या होर्डिंग्जवर दाखवून देत युवा सेनेने हेच आहेत अच्छे दिन? असा उपरोधिक सवाल केला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचा सिलेंडर २०१५ मध्ये ५७२ रुपयांना मिळत होता. त्याची किंमत वाढून हा सिलेंडर आता ७१९ रुपयांपर्यंत वाढल्याचे पोस्टरवर म्हटले आहे. त्याबरोबरच २०१५मध्ये प्रती लिटर ५२ रुपयांना मिळणाऱ्या डिझलचे दर २०२१मध्ये ८८.०६ रुपयांवर पोहोचले आहेत. तर ६४.६० रुपये प्रती लिटर मिळणाऱ्या पेट्रोलचे दरही आता ९६.६२ रुपयांवर गेल्याचे युवा सेनेने पोस्टरमधून म्हटले आहे.