ऑफलाईनच होणार दहावी, बारावीची परीक्षा, बोर्डाचे आदेश


मुंबई – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये यांच्यावर परीक्षेबाबत काय निर्णय होणार याची टांगती तलवार विद्यार्थ्यांवर होती. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याचे उत्तर दिले आहे. ऑफलाईन १०वी, १२वीच्या परीक्षा या होणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. बोर्ड ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी अनुकूल नसल्याने ऑफलाईनच परीक्षा होणार आहेत. शिक्षण विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला आहे.

आजच्या बैठकीत दहावी, बारावीची परीक्षा सद्यस्थितीला ठरलेल्या वेळापत्रकानुसार घेण्याबाबत चर्चा झाली. इंटरनेट कनेक्टीव्हीटी ग्रामीण भागात नसल्याने विद्यार्थ्यी ऑनलाईन परीक्षा देऊ शकत नसल्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच घेण्याबाबत बोर्डाचा आग्रह असून दहावीचे १६ लाख तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी राज्यात आहेत.