रुग्णालयातून राजेश टोपे यांचे महाराष्ट्राला पत्र


मुंबई – कोरोनाचा जेव्हापासून राज्यात शिरकाव झाला आहे, तेव्हापासून राज्यभर पायाला भिंगरी बांधून दौरे करणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे सध्या स्वतः कोरोनाविरोधात लढाई लढत आहेत. रुग्णालयात राजेश टोपे असतानाच महाराष्ट्रावर पुन्हा कोरोनाचे संकट घोंगावू लागले आहे. कोरोनाचा उद्रेक मुंबई-पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये होताना दिसत असून, कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत असल्यामुळे पुन्हा लॉकडाउन करण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. पण पुन्हा लॉकडाउनचे संकट ओढावू नये, यासाठी टोपे यांनी रुग्णालयातून महाराष्ट्राला कळकळीचे आवाहन केले आहे.

मागील आठवड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून राज्यभर फिरून आरोग्य सेवेचा आढावा घेणाऱ्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. राजेश टोपे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल झाले होते. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असताना राज्यावरील कोरोनाचे संकट पुन्हा बळावले आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वेगाने वाढत असून, रुग्णसंख्या आठ दिवसांत आटोक्यात न आल्यास लॉकडाउन लागू करण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिले असून, पुन्हा एकदा लॉकडाउन लागू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राजेश टोपे यांनी महाराष्ट्रासाठी लिहिलेले पत्र