प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांत झाला लीक ‘दृश्यम 2’


अलिकडेच दाक्षिणात्य सुपरस्टार मोहनलाल आणि मीना यांचा ‘दृश्यम 2’ हा चित्रपट रिलीज झाला होता. पण प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला झटका बसला आहे. तो चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काही वेळातच ऑनलाइन लीक झाला आहे. हा चित्रपट तमिळरॉकर्सने लीक केल्याचे सांगण्यात येत आहे.

हा चित्रपट २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दृश्यम’ या चित्रपटाचा रिमेक असून तो २०२० मध्ये रिलीज होणार होता. पण, कोरोनामुळे ओढावलेल्या संकटामुळे हा चित्रपट फेब्रुवारी २०२१ मध्ये रिलीज करण्यात आला. पण, तो प्रदर्शनानंतर अवघ्या काही तासांमध्ये लीक झाला आहे. सध्या टॉरंट, टेलीग्रामवर हा चित्रपट प्रदर्शित झाल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, तमिळरॉकर्सने या चित्रपटापूर्वी अनेक चित्रपट लीक केले आहेत. यात ‘उप्पेना’, ‘लाहोर कॉन्फिडेंशिअल’, ‘तांडव’, ‘मास्टर’, ‘क्रॅक’, ‘लक्ष्मी’, ‘आश्रम’, ‘लुडो’, ‘रसभरी’, ‘पाताल लोक’, ‘गुलाबो सिताबो’, ‘घुमकेतू’ असे अनेक चित्रपट प्रदर्शनापूर्वी किंवा प्रदर्शनानंतर काही तासांत लीक झाले आहेत.