सेल्फीचे असेही नुकसान – मनगट दुखावण्याचा तज्ञांचा इशारा

selfie
सेल्फी हा मानसिक आजाराचा एक प्रकार असल्याचे शास्त्रज्ञांनी अगोदरच जाहीर केलेले असताना सेल्फीमुळे शारीरिक इजा होण्याचाही इशारा आता तज्ञांनी दिला आहे. सेल्फीमुळे मनगट दुखावण्याची शक्यता असून अशा प्रकारच्या घटना वाढत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

सेल्फीचे प्रमाण युवक आणि अन्य वयोगटांतही वाढत असतानाच नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात हा इशारा देण्यात आला आहे. आयरिश मेडिकल जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे, असे फॉक्स न्यूज वाहिनीने म्हटले आहे.

‘सेल्पी रिस्ट’ असे या आजाराला तज्ञांनी नाव दिले आहे. हा विकार म्हणजे कार्पल टनेल सिंड्रोमचे एक रूप आहे. जे लोक जास्त सेल्फी घेतात त्यांना मनगटात चुणचूण किंवा किंवा तीक्ष्ण वेदना जाणवू शकतात. मनगटाला आतल्या बाजूने ताण दिल्यामुळे किंवा खूप वेळ फोन न हलविता धरल्यामुळे हा विकार होऊ शकतो, असे तज्ञांचे म्हणणे आहे.

ऑक्टोबर 2011 ते नोव्हेंबर 2017 या जगात सेल्फीमुळे 259 मृत्यू झाले होते. यातील सर्वाधिक आत्महत्या अमेरिका, भारत, रशिया आणि पाकिस्तानमध्ये घडल्या होत्या, असे 2018 मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात समोर आले होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment