अभिनेत्री करीना कपूर खान हिच्या घरी दुसऱ्या बाळाचा जन्म झाला आहे. अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूरला दुसरा मुलगा झाला असून कपूर आणि खान परिवाराने मुंबईतील ब्रीच कॅंडी हॉस्पिटलमध्ये अतिशय आनंदाने अतिशय आनंदाने बाळाचे स्वागत केलं. रणधीर कपूर यांनी करिनाला दुसरा मुलगा झाल्याची माहिती दिली. करिनाला मुलगा झाल्यामुळे आम्ही सर्वजण फार आनंदात आहोत. दुसर्या मुलाला तिने ब्रीच कॅंडी रुग्णालयात जन्म दिला आहे, आम्ही तिकडे जात असल्याचे रणधीर कपूर यांनी सांगितले. तिने आज सकाळी 9 वाजता बाळाला जन्म दिला असल्याचे रणधीर कपूर यांनी सांगितले.
करीना-सैफला पुत्ररत्नाचा लाभ
हिंदी कलाविश्वातील एक नावाजलेली आणि तितकीच चर्चेत असणारी ही जोडी दुसऱ्यांदा आई-बाबा होण्याचे सुख अनुभवत आहे. यापूर्वी त्यांना तैमूर हा एक मुलगा आहे. भारतीय चित्रपट जगतामधील प्रतिष्ठीत अशा कपूर कुटुंबातील लेक करीना आणि नवाबांच्या कुटुंबातील सैफ अली खान या सेलिब्रिटी जोडीच्या बाळाची बातमी कळताच सोशल मीडियापासून ते अगदी मित्रमंडळींच्या वर्तुळापर्यंत सर्वच ठिकाणहून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहेत. अनेक सेलिब्रिटी किड्सप्रमाणेच करिनाच्या दुसऱ्या बाळाच्या जन्माचा विषयही सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आला आहे. त्याचबरोबर बाळाचे नाव, नवी ओळख, नावामागचे कारण अशा अनेक चर्चांना आतापासूनच उधाण येण्यास सुरुवात झाली आहे.