नर्मदेत सापडतात स्वयंभू शिवलिंगे

baan
हिंदू धर्मियात पवित्र नद्यांचे स्नान फार महत्वाचे मानले गेले आहे. गंगा हि पवित्र नदी मानली जाते आणि गंगेत एकदा जरी स्नान केले तरी पापमुक्ती मिळते असा समज आहे. हेच पुण्य यमुनेत दोन वेळा स्नान केल्याने मिळते. मात्र नर्मदा अशी एकमेव नदी आहे जिचे नुसते नाव घेतले तरी पुण्यप्राप्ती होते असा भाविकांचा विश्वास आहे.

या नर्मदा नदीत मोठ्या संख्येने स्वयंभू म्हणजे आपोपाप तयार झालेली शिवलिंगे सापडतात. नर्मदेश्वर या नर्मदा नदीच्या काठावर शिवाचे एक प्राचीन मंदिर आहे. नर्मदा ही शिवाची कन्या मानली जाते आणि त्यामुळे तिच्यात सापडणारया प्रत्येक दगडगोट्यात शिवाचा वास असतो असे मानले जाते. नदीकिनारी असलेल्या शिवमंदिरात हीच शिवलिंगे ज्यांना बाण म्हणतात ती स्थापण्याची प्रथा आहे.

हे बाण अनेक साधू संन्यासी त्यांच्या पूजेत ठेवतात. या बाणाची मंदिरात स्थापना करताना प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नसते कारण ते स्वयंभू असतात. नर्मदेश्वर मंदिरात शिव उपासना केली तर मृत्यूचे भय राहत नाही आणि भक्ताच्या सर्व अडचणींचे निवारण होते असा विश्वास आहे.

Leave a Comment