हा आहे आर्मी शब्दाचा खरा अर्थ

army
जगातील जवळ जवळ प्रत्येक देशाचे स्वतःचे सैन्यबळ असते आणि त्या त्या देशाच्या नागरिकांना आपल्या सेनेचा सार्थ अभिमानही असतो. आर्मी हा एक शब्द मनाची मरगळ झटकून नवी स्फूर्ती देतो याचा अनुभव अनेकांनी घेतला असेल. मात्र आर्मी या शब्दाचा फुलफॉर्म अनेकांना ठाऊक नसेल. सर्वच देशांच्या सेनेसाठी आर्मी शब्द वापरला जातो. त्यानुसार भारताची सेना ती इंडिअन आर्मी असते.

आर्मी हा इंग्रजी शब्द मूळ लॅटीन अर्माटा यावरून आला असून त्याचा अर्थ आर्म्ड फोर्सेस असा आहे. म्हणजे देशाचे रक्षण करणारी फौज. आर्मी या शब्दाचा फुलफॉर्म अॅलर्ट रेग्युलर मोबिलिटी यंग असा आहे. याचा अर्थ तरुणांची अशी फौज जी प्रत्येक कृतीवर नजर ठेऊन आहे आणि गरज असेल तेव्हा एकीकडून दुसरीकडे पाठविली जाऊ शकते. अडचणीच्या परिस्थितीत देशवासीयांची सुरक्षा हि तिची मुख्य जबाबदारी.

जगात सर्वात मोठी फौज चीनकडे असून त्याच्या सेनेत १,६००,००० सक्रीय तर ५,१०,००० राखीव सैनिक आहेत. त्याखालोखाल भारताची फौज असून भारतीय सेनेत १,१२९,००० सक्रीय तर ९,६०,००० राखीव सैनिक आहेत.

Leave a Comment