या बहाद्दराला लागलेय कॉर्नफ्लेक्सचे व्यसन

philip
खाण्यापिण्याच्या प्रत्येकाच्या वेगळ्या आवडीनिवडी असू शकतात. आवड वेगळी आणि त्याचे व्यसन लागणे वेगळे. आवडीच्या व्यसनात रुपांतर झाले कि त्याची अडचण होऊ लागते याचा अनुभव ब्रिटन मधील फिलीप हा तरुण घेत आहे. त्याला कॉर्नफ्लेक्स खाण्याचे व्यसन जडले असून तो दिवसाला १३ पेक्षा अधिक कॉर्नफ्लेक्स पाकिटे फस्त करतो. अन्य कोणताच दुसरा पदार्थ तो खात नाही. सकाळचा नाश्ता, जेवण आणि रात्रीचे जेवण तो फक्त कॉर्नफ्लेक्स खातो.

हे व्यसन त्याला जडले त्याचे कारणही मजेशीर आहे. त्याने बाहेरचे खाणे आरोग्याला अपायकारक असते असे वाचले आणि तेव्हापासून हेल्दी खायचे म्हणून कॉर्नफ्लेक्स खायला सुरवात केली. त्याच्या या व्यसनामुळे तो जगभर चर्चेत आला आहे. घराच्या लोकांच्या मते एकवेळ कॉर्नफ्लेक्स खाणे आम्ही समजू शकतो पण तो त्यासोबत रोज १४७ चमचे साखर पोटात ढकलतो आहे ते वाईट आहे.

फिलीपच्या या व्यसनापाई त्याची नोकरी गेली आहे. त्याला व्यवस्थित उभे राहता येत नाही आणि जिने चढायला त्रास होतो. तो कुटुंबाबरोबर जेवत नाही कारण त्यांना त्याची हि सवय आवडत नाही. बाहेर जेवायला गेला तरी तो फक्त फज केक खातो कारण तो लवकर संपतो आणि घरी येऊन फिलीप पुन्हा कॉर्नफ्लेक्स खाऊ शकतो.

Leave a Comment