बाजारचे लोणी शुद्ध आहे का याची अशी करा खात्री

butter
बाजारात मिळणाऱ्या अनेक खाद्यवस्तू मध्ये भेसळ केली जाते. मुंबईत अमूल बटरची बनावट पाकिटे असलेले १ हजार किलो लोणी नुकतेच जप्त करण्यात आले होते. बाजारातून आपण अनेकदा लोणी विकत घेतो. ते शुद्ध आहे का याची तपासणी काही सोप्या पद्धतीने आपण घराच्या घरी करू शकतो.

एक भांड्यात एक चमचा लोणी घालून ते गरम करावे. ते त्वरित विरघळून तांबूस झाले तर लोणी शुद्ध आहे पण ते विरघळून पिवळसर दिसत असेल तर त्यात भेसळ आहे हे ओळखावे. एक ग्लासात लोणी आणि खोबरेल पातळ करून फ्रीज मध्ये ठेवावे. दोन्हीचा गोठण बिंदू वेगवेगळा असल्याने दोन वेगळे थर दिसायला हवेत. तसे न होता एकच थर दिसला तर लोण्यात भेसळ आहे.

शुद्ध लोणी हातावर ठेवले तर आपल्या शरीराच्या तापमानाने ते वितळू लागते. तसे ते वितळू लागले नाही तर लोण्यात भेसळ आहे हे ओळखता येते.

Leave a Comment