तांब्याच्या भांड्यातील पदार्थ खाताना घ्या काळजी

copper
तांबे या धातूचा वापर प्राचीन काळापासून अनेक भांडी बनविण्यासाठी केला जात आहे आणि तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी खूप लाभदायक असते हे आपण जाणतो. पूर्वीपासून तंभ्याच्या भांड्यातून स्वयंपाक करण्याची प्रथा होती ती काही काळ मागे पडली पण पुन्हा नव्याने तांब्याची भांडी स्वयंपाकात वापरात आली आहेत. या भांड्यातून ठेवलेले पदार्थ खाताना अथवा पिताना पुरेशी काळजी घेतली नाही तर ते माणसासाठी धोकादायक बनू शकते याची जाणीव ठेवायला हवी.

तांब्याच्या भांड्यात पदार्थ शिजविताना त्या भांड्यांना चांगली कल्हई आहे याची खात्री करून घ्यावी तसेच पदार्थ शिजला कि तो त्वरित दुसर्या भांड्यात काढून ठेवला गेला पाहिजे. तांब्याची रासायनिक प्रक्रिया लवकर होते. त्यामुळे लोणच्यासारखे पदार्थ, सफरचंद, अननस, पेरू, डाळिंब यासारखी फळे त्यात ठेऊ नयेत. तसेच दही, दुध, लिंबू रस, यासारखे पदार्थहि ठेवू नयेत आणि ते खाऊ नयेत.

या सर्व पदार्थांबरोबर तांब्याची रासायनिक प्रकिया होते आणि असे पदार्थ खाण्यात आले तर विषबाधा होण्याची शक्यता असते. अनेकदा ते जीवावर बेतू शकते. गार अथवा गरम दुध तांब्याच्या भांड्यात ठेऊन प्यायले गेले तर उलट्या, चक्कर येणे, जीव घाबरा होणे होऊ शकते त्यामुळे आरोग्याला नुकसान होण्याची भीती असते.

Leave a Comment