टोमॅटो हा आज कुठल्याची घरात नेहमीच आढळणारा आहे आणि टोमॅटोचा वापर कुठलीही भाजी, कोशिम्बीर, चटणी यात सर्रास केला जातो आहे. विविध पदार्थांना स्वाद देणारा टोमॅटो कच्चाही खाल्ला जातो. त्यात अनेक पाकाराची जीवनसत्वे, खानेजे, अँटी ऑक्सिडन्ट, फायबर भरपूर प्रमाणात आहेत.रक्तशुद्धी, हृदय विकार, कोलेस्टेरॉल नियंत्रण, दृष्टी चांगली राखण्यासाठी, शरीरातील विषारी तत्वे बाहेर टाकण्यासाठी टोमॅटोचे नियमित सेवन उपयुक्त ठरते.
टोमॅटो विषयी बरेच काही
हा बहुगुणी आणि अल्पमोली टोमॅटो अद्भुत म्हणायला हवा. कारण त्यात माणसापेक्षा अधिक जनुके आहेत. विशेष म्हणजे त्याचा सर्वाधिक वापर जगात कोशिंबीर किंवा सलाड बनविण्यासाठी केला जातो. मुख्य म्हणजे टोमॅटो हि भाजी नाही तर ते फळ आहे. द. अमेरिकेत मेक्सिको मध्ये ते प्रथम खाल्ले गेले त्याला त्यावेळी लव अॅपल असे म्हणत. मेक्सिकोच्या पहाडी जंगलात ५ ते ६ किलो वजनाचे टोमॅटो येतात. ते सुरवातीला हिरवे मग गडद ब्राऊन रंगाचे होतात.
या फळाला टोमॅटो हे नाव प्रथम अमेरिकेत मिळाले. भारतात ते आले तेव्हा त्याला विलायती वांगे म्हटले जाई. काविळीत टोमॅटोचा रस उपयुक्त असतो तसेच वजन नियंत्रणात राहण्यासाठी टोमॅटो उपयोगी पडतो. स्पेन मध्ये टोमॅटोची होळी खेळली जाते. येथेही ३०० ते ४०० ग्राम वजनाचे टोमॅटो पिकतात. त्यांचा रस अतिशय गोड असतो आणि त्यापासून थंड पेये बनविली जातात. द. आफ्रिकेच्या जंगलात काळे टोमॅटो येतात. त्याला काला जाम म्हटले जाते. अगदी पिवळ्या रंगाचे टोमॅटोही मिळतात. तसेच लाल, हिरवे टोमॅटो अगदी कॉमन आहेत.