काळी सफरचंदे कधी पहिलीत?

seb
रोज एक सफरचंद खा आणि निरोगी राहा असा सल्ला डॉक्टर देत असतात. लालभडक, पिवळी, हिरवी अश्या रंगाची सफरचंद आपण नेहमी बाजारात पाहतो. पण काळ्या रंगाची सफरचंद किती जणांनी पहिली असतील याची शंका आहे. काळी म्हणण्यापेक्षा गडद जांभळ्या रंगाची सफरचंदे तशी दुर्मिळ असली तरी तिबेटच्या पहाडात त्याची लागवड केली गेली आहे असे समजते. हुआनियु जातीची हि सफरचंद चायनीज रेड डीलीशीयस म्हणूनही ओळखली जातात.

सफरचंदाना असा गडद जांभळा रंग येण्यामागे तिबेटच्या ज्या नाइंग भागात ती येतात तेथील भौगोलिक परिस्थिती कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. डांगांग शेंग नोंग इ कॉमर्स ट्रेडिंग कंपनीने तिबेटच्या या भागात ५० हेक्टर जागेत या सफरचंदांची लागवड केली असून हा भाग समुद्रसपाटीपासून ३१०० मीटर उंचीवर आहे. येथे दिवसभर सूर्य असतो आणि त्याचे उन आणि अतिनील किरणे या सफरचंद झाडांना मिळतात त्यामुळे त्यांना जांभळा रंग येतो असे समजते.

या सफरचंदांची लागवड २०१५ साली केले गेली असली तरी अद्यापि सर्व झाडांना फळे धरलेली नाहीत. येथील सफरचंदे बीजिंग, शांघाई, गुआंग जो, शेंजेन येथील सुपरमार्केट मध्ये पाठविली जातात आणि तेथे त्यांना प्रचंड मागणी आहे. एका सफरचंदाची किंमत ५०० रुपये असून सोशल मिडीयावर हि सफरचंदे खरी नाहीत असा दावा केला जात आहे. एक खरे कि जगाच्या कुठल्याच बाजारात अजून हि सफरचंदे आलेली नाहीत.

Leave a Comment