काय आहेत मुकेश अंबानींच्या खाण्याच्या आवडी?

idli
देशातील बडे उद्योजक आणि रिलायंस उद्योगसमुहाचे मुकेश अंबानींच्या परिवाराने सध्या अवघा सोशल मिडिया व्यापला आहे. अंबानी परिवाराचे घर, मुलांची लग्ने,, त्यांच्या कार्स, नोकर याविषयी सतत काही ना काही लिहून येते आहे. रिलायंस साम्राज्याचा हा बादशहा रोज कश्या मेजवान्या करत असेल याची चर्चाही कदाचित होत असेल. पण प्रत्यक्षात मात्र मुकेश अंबानी यांच्या खाण्यापिण्याच्या आवडी अगदी सामान्य माणसाप्रमाणे आहेत हे ऐकले तर नवल वाटेल.

होय हे अगदी खरे आहे. मुकेश यांना अतिशय साधे जेवण आवडते. सकाळच्या नाश्त्याला पपईचा रस, थोडा सुका मेवा ते घेतात तर इडली सांबर आणि मसाला डोसा हेही त्यांचे आवडते पदार्थ आहेत. परवस्त असतील तर विमानतळावरही ते इडली सांबर खाणेच पसंत करतात.

जेवणात त्यांना डाळ भात, भाजी पोळी आवडते तर बाजरीची भाकरी त्यांना फारच भावते. मुकेश शाकाहारी आहेत पण फार क्वचित ते ऑम्लेट खातात. मधल्या वेळात खारे दाणे तोंडात टाकतात. मुंबईच्या स्वाती रेस्टॉरंटमधील पदार्थ त्यांची खास आवड आहे तसेच ताज कोलाबा येथील चाट खाणे त्यांना आवडते. घराबाहेर जेवताना ते बहुतेक वेळा गुजराथी जेवण पंसंत करतात.

Leave a Comment