मधुमेहींनी त्याच्या आहारामध्ये डाळींबाचा समावेश करावा का?

Pomegranate
जर एखाद्या व्यक्तीला नुकतेच मधुमेह झाल्याचे निदान झाल असले, तर याने काय खावे काय प्यावे इथपासून व्यायाम कसा करावा, जीवनशैलीमध्ये बदल कसे करावेत असे अनेक सल्ले दिले जात असतात. आता हा विकार फारसा दुर्मिळ राहिला नसल्यामुळे याबद्दलची माहिती सर्वसाधारण मनुष्याला देखील झाली आहे. मधुमेहींनी आपल्या आहाराच्या बाबतीत जागरूक असणे अत्यंत आवश्यक आहे हे खरे असले तरी या संबंधी दिल्या जाणाऱ्या निरनिराळ्या सल्ल्यांमुळे क्वचित गोंधळच उडण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे या विकाराबद्दल लोकांचे ज्ञान आणि जागरूकताही वाढू लागली आहे. त्यामुळे मधुमेहींनी आपल्या आहाराबद्दल किती आणि कशी काळजी घ्यावी याची माहिती मधुमेहींना सहज उपलब्ध होऊ लागली आहे. तसच डॉक्टरांच्या सल्ल्याने मधुमेहींनी आपला आहार आखावा.
Pomegranate1
मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आहारातून साखर संपूर्णपणे वर्ज्य करून कर्बोदकांचे सेवनही अतिशय मर्यादित करायला हवे. तसेच या व्यक्तींनी आपल्या आहारामध्ये धान्यांचे प्रमाण वाढविणे चांगले. तसेच दालचिनी, मेथी दाणे, हळद यांसारख्या मसाल्याच्या पदार्थांच्यामुले देखील रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. मधुमेहींनी आपल्या आहारामध्ये फायबरचे प्रमाण मुबलक असलेली फळे, भाज्या समाविष्ट करावी. त्यामुळे फायबर मुबलक मात्रेमध्ये असलेल्या डाळींबाचा समावेश आहारामध्ये करणे मधुमेहींसाठी उपयुक्त ठरू शकते.
Pomegranate2
डाळींबामध्ये अँटी ऑक्सिडंटस् मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तसेच डाळिंबाच्या बियांमुळे शरीरातील ‘इंस्युलीन सेन्सिटीव्हीटी’ सुधारण्यास मदत होत असल्याने डाळींबाचे सेवन मधुमेहींसाठी उपयुक्त असल्याचे तज्ञ म्हणतात. डाळींबामध्ये कर्बोदकांचे प्रमाण अतिशय कमी असून, त्यामुळे ब्लड शुगर लेव्हल्स नियंत्रित राहण्यास मदत होते. मधुमेहासोबतच हृदयरोगांशी निगडीत व्याधींवरही डाळिंब उपयुक्त आहे. डाळींबाच्या रसाच्या नियमित सेवनाने अनिमिया दूर होऊन हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते. त्यामुळे विशेषतः गर्भवती महिलांसाठी याचे सेवन उत्तम मानले गेले आहे. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांनी आणि नसणाऱ्यांनी देखील डाळिंबाचे सेवन अवश्य करावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment