हा होता जगातील सर्वात महाग घोडा

green
श्रीमंत व्यक्तींच्या बाबतीत आपण सतत काही न काही ऐकत असतो. पण रूप गुणांच्या जोरावर काही प्राणीही श्रीमंत बनतात. ग्रीन मंकी नावाचा रेसचा घोडा त्याच्या मृत्युनंतरहि जगातील सर्वात महाग घोडा हा खिताब कायम राखून आहे. हा घोडा जगातील दुर्लभ, सुंदर घोडा म्हणूनही प्रसिद्ध आहे.

या घोड्याला लिलावात १ कोटी ६० लाख डॉलर्स म्हणजे १ अब्ज १६ कोटी रुपयांना विक्री केली गेली होती त्यावेळी तो २ वर्षाचा होता. हा लिलाव २००६ मध्ये झाला होता. आपल्या पहिल्याच रेस मध्ये त्याने ९.८ सेकंदात ८ मैलाचे अंतर कापून जगातील सर्वाधिक वेगवान घोडा असा सन्मान मिळविला होता. मात्र याच रेसमध्ये तो जखमी झाला आणि हीच त्याची पहिली व अखेरची रेस ठरली. तरीही त्याला लिलावात इतकी प्रचंड रक्कम मोजली गेली होती. वयाच्या १४ व्या वर्षी म्हणजे मे २०१८ मध्ये तो मरण पावला मात्र त्याच्या मृत्यूची बातमी जगाला जुलै मध्येच कळली होती.

Leave a Comment