भारत जगातील महत्वाचे व्यापार केंद्र बनण्याच्या दृष्टीने जोरदार वाटचाल करत आहे आणि येथील ग्राहक संख्या लक्षात घेऊन अनेक गुंतवणूकदार भारताकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे आज भारतात विविध ब्रांड कंपन्या व्यवसाय करताना दिसतात. यातील काही कंपन्या नावावरून विदेशी वाटतात आणि अनेक ग्राहकांची या कंपन्या विदेशी आहेत अशीच समजूत आहे. मात्र या कंपन्या पूर्णपणे देशी आहेत. त्यातील काही कंपन्या अश्या
वाटतात परदेशी, पण या कंपन्या आहेत पूर्ण देशी
आजकालच्या तरुणाईत आणि खरेतर देशातील सर्व वयोगटात लोकप्रिय ठरलेले कॅफे कॉफी डे यातील पहिले उदाहरण. हि चेन व्ही. जी. सिद्धार्थ यांच्या मालकीची असून तिचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. विविध प्रकारच्या कॉफीची चव चाखावणाऱ्या या चेन ने १९९६ मध्ये विस्तार योजना राबवून देशभरात हि कॅफे मालिका सुरु केली आहे.
रेमंड्स या गेली कित्येक दशके फॅब्रिक क्षेत्रात दबदबा निर्माण केलेल्या कंपनीचे मुख्यालय मुंबईत असून सिंघानिया यांच्या मालकीची हि कंपनी १९२५ साली सुरु झाली आणि सुरवातीपासूनचे तिची प्रगती वेगाने होत राहिली. आजही हा देशातील सर्वाधिक पसंतीचा ब्रांड आहे.
वाहनाचे टायर बनविणारी एमआरएफ कंपनी म्हणजे मद्रास रबर कामाप्नी. तमिळनाडूतील चेन्नई येथे मुख्यालय असलेल्या या नामवंत कंपनीची सुरवात १९५२ साली के. एम. मापिल्लाई यांनी केली होती. वाहन क्षेत्रात आदराने घेतले जाणारे नाव म्हणजे ब्रिटनची जग्वार कंपनी. लक्झरी कार बनविणाऱ्या या कंपनीची मालकी सध्या भारतीय उद्योजक रतन टाटा यांच्याकडे आहे. १९३३ साली विल्यम लोन्स यांनी हि कंपनी सुरु केली मात्र तिचे मालक नेहमीच बदलत राहिले. फोर्ड मोटर्स कडून टाटा यांनी हि कंपनी खरेदी केली.