पुनर्जन्म असतो याचे पुन्हा मिळाले पुरावे

rebirth
विज्ञान पुनर्जन्म मानत नाही तरीही पुनर्जन्माचे अनेक किस्से सांगितले जातात. या विषयावर अनेक चित्रपट नाटके येतात आणि ते गाजतातही. काही दिवसांपूर्वी भूतानचा युवराज तीन वर्षाचा असताना भारतात आला आणि त्याने नालंदा येथील त्याच्या गतजन्मातील अनेक ठिकाणे दाखविली याच्या बातम्या झळकल्या होत्या. आता पुन्हा एकदा पुनर्जन्म असतो याचे पुरावे मिळाले आहेत.

लखनौ येथील बलबीरसिंग यांची कन्या अमृता हिने वडील सांगत असलेल्या त्याच्या गतजन्मातील गावी जाऊन ते जे सांगत आहेत त्याची शहनिशा प्रत्यक्ष त्या गावात जाऊन तेथील बुजुर्गांना भेटून करून घेतली आहे आणि त्यावर पास्ट फॉरवर्ड नावाचे ४२५ पानी पुस्तक प्रकाशित केले आहे.

त्यानुसार बलबीरसिंग हे ९६ वर्षीय व्यक्ती धर्माने शीख आहेत मात्र वयाच्या ३-४ वर्षापासून ते त्यांचा मागचा जन्म पाकिस्तानात दिंगा शहरात झाला आणि त्यांचे नाव बहादूर सुंदरदास चोपडा असल्याचे त्यांना आठवत होते. बलबीरसिंग यांचा जन्म रायबरेली येथे झाला असून त्यांना ९ भावंडे होती. त्यांचे वडील रेल्वे मध्ये उच्च पदावर होते व त्यामुळे त्यांच्या सारख्या बदल्या होत असत.

ते लहान असताना त्यांचे कुटुंब लग्नानिमित्ताने दिन्गा गावी गेले तेव्हा ते आईच्या कडेवरून उतरले आणि समोर असलेल्या महालात घुसले. तेथे अनेक खोल्या पार करून ते एका खोलीत गेले आणि तेथील पियानो ओळखला. तसेच आपले नाव बहादूर सुंदरदास असल्याचे सांगून त्यांनी त्याकाळच्या अनेक घटना अचूक सांगितल्या. गतजन्मात ते ब्रिटीश सेनेला रेशन आणि युनिफोर्मचा पुरवठा करत असत हेही सांगितले. त्यावेळी ते खूपच लहान असल्याने त्यांची आई घाबरली आणि पुढच्या आयुष्यात कधीही पुन्हा या गावी गेली नाही.

सध्या हि हवेली साजिद याच्या मालकीची असून त्यांनी बलबीर ज्या आठवणी सांगत होते त्या खऱ्या असल्याचे सांगितले. बलबीर यांची मुलगी अमृता हिने या गावात मुक्काम करून वडील सांगत असलेल्या अनेक आठवणींची खात्री अनेक लोकांशी बोलून करून घेतली. वडिलांच्या गतजन्मातील कुटुंबाचा शोध घेऊन त्या व्यक्तीशी बोलणी केली आणि नंतर या अनुभवावरचे पुस्तक प्रकाशित केले.

Leave a Comment