नासाच्या ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ची भारतीय वंशाच्या डॉ. स्वाती मोहन यांच्यामुळे झाली यशस्वी लँडिंग


न्यूयॉर्क – मंगळ ग्रहावर पाणी आणि जीवसृष्टीचा तपास करण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एक रोव्हर पाठवला आहे. भारतीय वेळेनुसार रात्री दोन वाजता ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ची यशस्वी लँडिंग ही करण्यात आली. एका भारतीय वंशांच्या महिला शास्त्रज्ञाला या लँडिंगचे संपूर्ण श्रेय जाते. 203 दिवस या संपूर्ण मिशनला लागले असून 47 कोटी किलोमीटरचा प्रवास या सहा पायांच्या रोबोटने सात महिन्यात पूर्ण करुन मंगळ गाठले. या संपूर्ण मिशनमधील सर्वात कठीण आणि धोकादायक क्षण तो होता रोव्हर मंगळावरील सर्वात अवघड जजिरो क्रेटरवर उतरण्याचा. रोव्हराचा वेग शेवटच्या सात मिनिटात हा शुन्यावर आणत सुरक्षित लँडिंग करण्याची मोठी जबाबदारी भारतीय वंशाच्या अमेरिकन शास्त्रज्ञ डॉ. स्वाती मोहन यांनी यशस्वीरित्या पेलली.

‘दि सांयस’ने दिलेल्या माहितीनुसार मंगळ ग्रहाजवळ पोहचणे सोपे असून सर्वात कठीण काम रोव्हरच्या लँडिंगचे होते. कारण, या स्टेजला येऊन बहुतेक रोव्हर बंद पडतात. शेवटच्या 7 मिनिटात ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’ने 12 हजार मैल प्रति तासावरून शुन्यावर येत यशस्वीरित्या लँडिंग केली. या उंचीवर, रोव्हरच्या वेगाला शुन्यावर आणत नंतर परत त्याला लँड करणे हे काही चत्मकारापेक्षा कमी नव्हते. पण स्वाती मोहन आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी यशस्वीरित्यापुर्ण केली.

स्वाती या इंजीनियर आहेत.’पर्सिव्हरन्स रोव्हर’ने लँडिंग करताच याच्या हॅलिकॉप्टरने पंख उघडले. हे रोव्हर लँड होताच स्वाती आणि त्यांच्या टीमच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वांना दिसत होता. यानंतर संपूर्ण जगाला एक मेसेज मिळाला ‘Touchdown confirmed’ म्हणजेच लँडिंग यशस्वी झाली. हे ऐकण्यासाठी संपूर्ण जग उत्सुक होते.