मॉरिस ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू


बंगळूरु – आयपीएलच्या इतिहासातील ख्रिस मॉरिस हा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. भारताच्या युवराज सिंहचा विक्रम मॉरिसने मोडीत काढला आहे. दिल्लीने १६ कोटी रुपयांत युवराजला खरेदी केले होते. ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने २०२१ च्या आयपीएल लिलावात १६ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले आहे. संघमालकांमध्ये ७५ लाख रुपयांची मूळ किंमत असणाऱ्या ख्रिस मॉरिसला खरेदी करण्यासाठी रस्सीखेच झाली

ख्रिस मॉरिसला आपल्या संघात घेण्यासाठी आरसीबी, चेन्नई, पंजाब आणि राजस्थान या संघाने रस दाखवला. पण, १६ कोटी २५ लाख रुपये खर्च करत राजस्थानने आपल्या संघात त्याला घेतले आहे. गतवर्षीच्या आयपीएलमध्ये ख्रिस मॉरिसने आरसीबीकडून खेळताना ९ सामन्यात ११ बळी घेतले होते. मॉरिसला गेल्या आयपीएलच्या लिलावत १० कोटी रुपयांत आरसीबीने खरेदी केले होते. पण मॉरिसला यंदा आरसीबीने करारमुक्त केले होते.