३१ मार्चपर्यंत ‘हे’ काम न केल्यास तुमचे पॅनकार्ड काही कामाचे नाही


नवी दिल्ली – आपल्या देशात पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे अत्यावश्यक दस्तावेज बनले आहेत. ओळखपत्रासोबत बँक संबंधित काम करण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जात आहे. तसेच बँक, इन्कम टॅक्स रिटर्न, गुंतवणूकसह अनेक ठिकाणी पॅन कार्डचा वापर केला जातो. पण आता आधार कार्डशी पॅनकार्ड लिंक करण्याची तारीख जवळ आली आहे. जूनमध्ये एक प्रसिद्धीपत्रक काढून सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सने सांगितले होते की, पॅनकार्डला आधार कार्ड सोबत लिंक करण्याची तारीख वाढवली आहे. पण ३१ मार्च २०२१ आता जवळ आल्याने लवकर हे काम करावे लागणार आहे.

आधार कार्डला पॅनकार्डशी लिंक करण्याची तारीख याआधी ३० जून २०२० होती. नोटिफिकेशनच्या माहितीनुसार, पॅन कार्डशी आपले आधार कार्ड लिंक केले नाही, तर आपले पॅनकार्ड १ एप्रिल २०२१ पासून काहीही कामाचे राहणार नाही. याचा अर्थ तुम्ही तुमच्या पॅनकार्ड वापर कुठेच करु शकणार नाही.

सध्याच्या कायद्यानुसार, आधार कार्डशी पॅन कार्डला लिंक करणे बंधनकारक आहे. जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नाही, तर पॅन कार्डचा वापर करता येणार नाही. ज्या ठिकाणी पॅन कार्डचा वापर आवश्यक आहे. जसे बँक अकाउंट उघडणे, एफडी गुंतवणूक करणे, इन्कम टॅक्ट रिटर्न भरणे, या कामात मोठी अडचण निर्माण होऊ शकते.