मराठी चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार जया बच्चन


बॉलिवूड सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री म्हणून जया बच्चन ओळखल्या जातात. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्याशी 1973 साली त्यांनी लग्न केले. त्या तेव्हापासून काही मोजके चित्रपट वगळता सिनेसृष्टीत फारशा झळकल्या नाहीत. ‘सनग्लासेस’ या चित्रपटात 2013 साली त्या शेवटच्या झळकल्या होत्या. अन् तब्बल सात वर्षानंतर आता त्या सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. पण यावेळी त्या हिंदी नव्हे तर चक्क मराठी चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीद्नारे पुनरागमन करत आहेत.

याबाबत शी द पीपल या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तानुसार मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक गजेंद्र अहिरे या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. आजवर अनुमती, पोस्टकार्ड, अनवट, बायोस्कोप यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली आहे. अद्याप या आगामी चित्रपटाचे नाव निश्चित झालेले नाही. या चित्रपटाच्या पटकथा आणि कास्टिंगवर सध्या काम सुरु आहे. पण मराठीतील हा एक बिग बजेट चित्रपट असेल अशी चर्चा आहे. शिवाय या चित्रपटात जया बच्चन एक महत्वाची भूमिका साकारताना दिसतील. या चित्रपटाच्या माध्यमातून त्या मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहेत.