कोरोना अद्याप संपलेली नाही. पण याकडे मोदी सरकार करत आहे दुर्लक्ष – राहुल गांधी


नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील सार्स-सीओव्ही -2 व्हायरसची देशात पहिल्यांदाच चार जणांना लागण झाल्याचे समोर आले आहे. तर ब्राझीलच्या व्हायरसचा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याची पुष्टी झाली आहे. भारतात दक्षिण आफ्रिका व ब्राझील येथून कोरोनाचे नवीन स्ट्रेन आल्याची बाब गंभीर असून काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांनी याच मुद्द्यावरुन केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे.


ट्विट करत केंद्र सरकारवर राहुल गांधी यांनी निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, कोरोना अजून संपलेली नाही. सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे आणि याबाबत अति आत्मविश्वासाचा बाळगत आहे. भारताबाहेरहून आलेल्या सर्व प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांची तपासणी केली गेली जाणार आहे आणि त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवले गेल्याचे ICMR चे महासंचालक बलराम भार्गव यांनी सांगितले आहे. ‘आयसीएमआर-एनआयव्ही’ या चार बाधित लोकांच्या नमुन्यांमधून दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म वेगळा करण्याचा आणि इतर माहिती एकत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.

ब्राझीलहून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परत आलेल्या एका व्यक्तीला ब्राझीलच्या कोरोना व्हायरस स्ट्रेनची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. या दोन्ही व्हायरस प्रकारांचा संदर्भ घेत भार्गव यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म डिसेंबरच्या मध्यावधीत प्रथम आढळला. दक्षिण आफ्रिकेचा फॉर्म 44 देशांमध्ये पसरला आहे. ब्राझीलच्या विषाणूचा प्रकार जानेवारीमध्ये आढळला होता आणि तो आतापर्यंत 15 देशांमध्ये पसरला आहे.

ब्रिटनच्या नव्या कोरोना स्ट्रेनची लागण झालेल्या देशातील रुग्णांची संख्या वाढून 187 झाली आहे. यात कुणाचाही मृत्यू झालेला नाही. नवीन स्वरुपाचे बारकाईने निरीक्षण केले जात आहे. याबाबत माहिती देताना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले की, ब्रिटनहून येणाऱ्या प्रवाश्यांसाठी आरटी-पीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे. संक्रमित लोकांचे जीनोम सिक्वेन्सिंग केले जात आहे. ही एक चांगली रणनीती आहे.