शिवेंद्रराजेंची राष्ट्रवादीत घरवापसी?; मोठ्या नेत्याची जाहीर ऑफर


सातारा – सध्या नगरपालिका निवडणुकीमुळे साताऱ्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याचदरम्यान भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. राष्ट्रवादीकडून नगरपालिका निवडणुकीत पॅनेल उभे करण्यात आले असून या निवडणुकीचे नेतृत्व दीपक पवार करतील, असे शशिकांत शिंदे यांनी सांगितल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष वाढण्याचे चित्र सध्या दिसत आहे. पण यावेळी त्यांनी शिवेंद्रराजे भोसले यांना जाहीर ऑफर दिली आहे.

शशिकांत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीत आल्यास नगरपालिका निवडणुकीचे नेतृत्व शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे देऊ, असे जाहीर केले आहे. पत्रकारांच्या नेतृत्व कोण करणार या प्रश्नावर बोलताना शशिकांत शिंदे यांनी, राष्ट्रवादीत शिवेंद्रराजे आले, तर ते करतील. नाही आले तर मी आणि दीपक पवार करु, असे उत्तर दिले. आता शिवेंद्रराजे भोसले शशिकांत शिंदेंच्या या ऑफरवर काय उत्तर देतात हे मात्र आता पहावे लागणार आहे.