क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून नमन ओझाची निवृत्ती


नवी दिल्ली – सोमवारी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज नमन ओझाने निवृत्ती जाहीर केली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रदेशकडून खेळणाऱ्या ३७ वर्षीय ओझाने एक कसोटी, एक एकदिवसीय आणि दोन टी-२० सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

भारतासाठी तसेच राज्यासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे मी समाधानी आहे. परंतु आता पुढे जाण्याची वेळ असून मी सर्व प्रकारच्या क्रिकेटला अलविदा करम्याचा निर्णय घेतल्याचे ओझा म्हणाला. १४६ प्रथम श्रेणी सामन्यांत ओझाने २२ शतकांसह १0७५३ घावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स, सनरायजर्स हैदराबाद, दिल्ली डेअडेव्हिल्स या संघाकडून तो आयपीएलमध्ये खेळला आहे. ११३ आयपीएल सामन्यात सहा अर्धशतकासह ओझाने १५५४ धावा चोपल्या आहेत. आतंरराष्ट्रीय सामन्यात ओझाच्या नावावर एकाही शतकाची किंवा अर्धशतकाची नोंद नाही. कसोटीतील ३५ ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.