शाहरूख खानसोबत पुन्हा एकदा काम करणार आलिया भट


शाहरुख खान आणि आलिया भट ‘डिअर जिंदगी’ चित्रपटानंतर पुन्हा एकदा डार्लिंग्स या चित्रपटात एकत्र काम करणार आहेत. पण शाहरुख खान यावेळी चित्रपटाचा निर्माता म्हणून समोर येणार आहे. एका आई आणि मुलीची कथा डार्लिंग्स चित्रपटामध्ये रेखाटण्यात आली आहे. डार्लिंग्स चित्रपटात जसमीत दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

जसमीत डार्लिंग्स चित्रपटाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याने फोर्स २, फन्ने खां आणि पति पत्नी और वो सारख्या चित्रपटाची कथा लिहिली आहे. आलिया भट्टसह डार्लिंग्स चित्रपटात शेफाली शाह, विजय वर्मा आणि रोशन मॅथ्यू देखील काम करणार आहेत. या चित्रपटात आई-मुलीची एक विचित्र कथा आहे. या चित्रपटात आलिया भट मुलगी आणि शेफाली शाह आईची भूमिका साकारणार आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, ही कथा मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटूंबाच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. २०२१ मध्येच डार्लिंग्स चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार असून सध्या चित्रपटाच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरू असून हा चित्रपट याचवर्षीच रिलीज होणार आहे. शाहरुख खान डार्लिंग्स या चित्रपटाव्यतिरिक्त पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो दीपिका पादुकोणसोबत या चित्रपटात दिसणार आहे. पठाण चित्रपटात जॉन अब्राहम खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.