आर. अश्विनची खणखणीत शतकसह मोठ्या विक्रमाला गवसणी


चेन्नई – टीम इंडियाचा फिरकीपटू आर, अश्विन आणि कर्णधार विराट कोहली यांच्या ९६ धावांच्या भागीदारीमुळे भारतीय संघ विजयाच्या उंबरठ्यावर येऊन बसला आहे. पाच फलंदाज तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात धडाधड माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडेल, असा अंदाज होता. पण, अश्विन व विराट यांनी जुन्या चेंडूचा फायदा उचलताना इंग्लंडच्या गोलंदाजांना कुटले.

दमदार खेळी करताना दोघांनीही भारताची आघाडी चारशेपार नेली. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला. अम्पायर कॉल असल्यामुळे त्याला माघारी परतावे लागले. घरच्या मैदानावर अश्विनने इंग्लंडचा चांगलाच पाहुणचार केला अन् कसोटीतील पाचवे शतक पूर्ण केले.

पुजारा ( ७) सकाळच्या सत्रात पुन्हा विचित्र पद्धतीने बाद होऊन माघारी परतला. त्यानंतर यष्टीरक्षक बेन फोक्स याने सुरेख पद्धतीनं रोहित शर्माला ( २६) यष्टिचीत करून माघारी पाठवले. बढती मिळालेला ऋषभ पंत ( ८), अजिंक्य रहाणे (१०) आणि अक्षर पटेल ( ७) एकामागोमाग माघारी परतले. भारताची अवस्था ६ बाद १०६ अशी झाली होती.

दमदार फलंदाजी करताना इंग्लंडच्या गोलंदाजांना आर अश्विन आणि विराट कोहली यांनी दमवले. सातव्या विकेटसाठी या दोघांनी १७७ चेंडूंत ९६ धावांची भागीदारी केली. विराट ६२ धावांवर ( १४९ चेंडू व ७ चौकार) माघारी परतला.

इंग्लंडविरुद्ध १०००+ धावा आणि १०० विकेट्स घेणारा आर अश्विन सातवा खेळाडू ठरला. यापूर्वी जॉर्ज गिफन (ऑस्ट्रेलिया), माँटी नोबल ( ऑस्ट्रेलिया), गॅरी सोबर्स ( वेस्ट इंडिज) , रिचर्ड हॅडली ( न्यूझीलंड), कपिल देव ( भारत), शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया), शॉन पोलॉक ( दक्षिण आफ्रिका) यांनी अशी कामगिरी केली आहे. कपिल देव यांच्यानंतर इंग्लंडविरुद्ध १००० धावा व १०० विकेट्स घेणारा अश्विन हा पहिलाच भारतीय आहे. कपिल देव यांनी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्याविरुद्धही अशी कामगिरी केली आहे.

चेपॉकवर एकाच कसोटीत पाच विकेट्स व अर्धशतक करणारा आर अश्विन तिसरा भारतीय खेळाडू आहे. यापूर्वी १९८०मध्ये कपिल देव यांनी पाकिस्तानविरुद्ध आणि २०१६मध्ये रवींद्र जडेजाने इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केली होती.