रामदास आठवलेंनी दत्तक घेतला बिबट्या; केक कापून केले नव्या पाहुण्याचे स्वागत


मुंबई : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला (नॅशनल पार्क) भेट देत सिंबा नावाच्या अडीच वर्षाच्या बिबट्याला दत्तक घेतले आहे. रामदास आठवले आपला मुलगा जीत याच्या आग्रहाखातर गेल्या चार वर्षांहून अधिक काळापासून एका बिबट्याला दत्तक घेण्याचा प्रयत्न करीत होते. आज तो अखेर दिवस उजाडला. या बिबट्याचे नाव त्यांनी सिंबा असे ठेवले आहे.

सिंबाच्या वाढदिवसानिमित्ताने रामदास आठवले यांनी केक कापून त्याचे स्वागत केले. रामदास आठवलेंनी आपल्या शैलीत सिंबाचे नामकरण केले. रामदास आठवले हे आपली वक्तव्य आणि कवितांमुळे नेहमी चर्चेत असतात. कंगना राणावत प्रकरणात रामदास आठवले यांनी अभिनेत्रीला सुरक्षा देणार असल्याची घोषणा केली होती.