मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यामुळे प्रचारावेळी स्टेजवर असलेल्या नेत्यांना कोरोनाची लागण


अहमदाबाद – गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी कोरोनाबाधित असल्याचा रिपोर्ट आला आहे. मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना रविवारी एका कार्यक्रमात स्टेजवरच चक्कर आली होती आणि बेशुद्ध झाले होते. त्यानंतर यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. हॉस्पिटलकडून जारी करण्यात आलेल्या मेडिकल बुलिटेननुसार, मुख्यमंत्री रुपाणी यांची तब्येत स्थिर आहे.

मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह गुजरात भाजपच्या संसदीय बोर्डात सोबत असणारे गुजरात भाजपच्या दोन वरिष्ठ नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्याचे महामंत्री भीख दलसानीया आणि कच्छचे खासदार विनोद चावडा यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यांच्या संपर्कात आलेल्या नेत्यांची देखील आता चाचणी करण्यात येण्याची शक्यता आहे.

सोमवारी डॉ. आरके पटेल यांनी सांगितले की, कोणाच्या मदतीशिवाय विजय रुपाणी हे रुममध्ये फेरफटका मारत आहेत. त्यांचे अन्य रिपोर्ट जसे की ईसीजी, ईको, सीटी स्कॅन, ऑक्सीजन स्तर सामान्य आहे. त्यांची तब्येत स्थिर आहे, त्यांना 24 तास देखरेखीत ठेवण्यात येईल. डिहाईड्रेशन, थकवा आणि हेक्टिक कामामुळे त्यांना चक्कर आली होती.

सध्या 6 महापालिंकाच्या निवडणुकांचा प्रचार गुजरातमध्ये जोरात सुरू आहे. यामुळेच मुख्यमंत्री विजय रुपाणी रविवारी बडोदे येथील निजाम पुरा येथे पोहोचले होते. पण स्टेजवर पोहोचले असतानाच त्यांना भोवळ आल्यानंतर त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.