लवकरच आजोबा होणार अरूण गवळी


बेधडक, दोस्तीगिरी, बस स्टॉप अशा अनेक मराठी चित्रपटात झळकलेला अभिनेता अक्षय वाघमारे बाबा होणार आहे. असून अक्षयची पत्नी योगिता लवकरच गोंडस बाळाला जन्म देणार आहे. ‘डॅडी’ अर्थात गँगस्टर अरूण गवळीची योगिता ही मुलगी आहे, त्यामुळे लवकरच अरूण गवळी आजोबा होणार आहे.


अक्षय व योगिता यांचा मोठ्या थाटामाटात 8 मे 2020 रोजी विवाहसोहळा पार पडला होता. आता अक्षय व योगिता यांच्या घरी नवा पाहुणा येणार आहे. अक्षयने ही गुड न्यूज चाहत्यांसोबत A grand adventure is about to begin, Waiting for our new edition…❤️ अशा कॅप्शनसह शेअर केली. लग्नाआधी 5 वर्षांपासून अक्षय व योगिता दोघे एकमेकांना ओळखत होते. यादरम्यान कुटुंबीयांनी दोघांनाही लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

फत्तेशिकस्त, बेधडक, दोस्तीगिरी आणि बस स्टॉप या मराठी चित्रपटांत अक्षयने काम केले आहे. अक्षयने ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात सरदार कोयाजी नाईक बांदल यांची भूमिका साकारली होती. योगिता ही एक एनजीओ चालवते. या माध्यामातून महिलांच्या आरोग्यासाठी ती काम करते.