मागच्या निवडणुकीत आम्ही जे रोहिणी खडसेंचे नुकसान केले, ते आगामी निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू


जळगाव : काल राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मुक्ताईनगर येथे आले होते. त्यांनी यावेळी केलेल्या वक्तव्यामुळे मुक्ताईनगर मतदारसंघातून रोहिणी खडसे यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. रोहिणी खडसे यांना पुढील विधानसभा निवडणुकीत विजयी करण्यासाठी मुक्ताईनगर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकद लावणार, असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.

मागच्या निवडणुकीत आम्ही रोहिणी खडसे यांचे जे नुकसान केले, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिल्यामुळे जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे पुढील विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवारच जाहीर केला की काय ? या चर्चेला उधाण आले आहे. मागच्या निवडणुकीत आम्ही रोहिणी खडसे खेवलकर यांचे जे नुकसान केले, ते आगामी विधानसभा निवडणुकीत व्याजासकट भरुन काढू. रोहिणी खडसेंना १५ टक्के मताधिक्याने निवडून आणू. त्यासाठी संपूर्ण ताकद राष्ट्रवादी काँग्रेस उभी करेल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले आहे.