भारतातील ‘या’ राज्यात टेस्ला मोटर्स सुरू करणार उत्पादन केंद्र


नवी दिल्ली : भारतात आता आपले जाळे मोठे करण्याच्या तयारीत जगातील सगळ्यात मोठी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी टेस्ला असून कंपनीने एका राज्याची यासाठी निवड केली आहे आणि कंपनी तिथे आपले उत्पादन युनिट उभारणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी अधिकृतपणे दिलेल्या मागहितीनुसार, कर्नाटकमध्ये टेस्ला ही ऍलन मस्कची जगातील सगळ्यात श्रीमंत कंपनी इलेक्ट्रिक कार उत्पादक युनिट सुरू करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी ही माहिती केंद्रीय अर्थसंकल्पातून राज्याला मिळणाऱ्या फायद्यांचा उल्लेख करुन एका निवेदनामार्फत दिली आहे.

दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक कॉरिडोरही तुमकूर जिल्ह्यामध्ये बांधला जाणार आहे. सुमारे 7,725 कोटी याची किंमत असणार आहे. तर यामुळे 2.8 लाख लोकांना रोजगार मिळेल. जानेवारीमध्ये यासाठी अमेरिकन इलेक्ट्रिक कार कंपनीने भारतात नोंदणी केली. विशेष म्हणजे बेंगळुरू शहरातही संशोधन आणि विकास केंद्र टेस्लाने उघडले आहे.

कर्नाटकमधील बंगळुरु येथे टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या नावाने टेस्ला कंपनीने नोंदणी केली आहे. बंगळुरुत लक्झरी इलेक्ट्रिक कार्सची निर्मिती आणि विक्री कंपनी करणार आहे. बंगळुरुत कंपनीने कामाला देखील सुरुवात केली आहे.

आरओसी फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, 8 जानेवारी रोजी टेस्लाने बेंगळुरू येथे रजिस्ट्रार ऑफ कंपनीजसह (आरओसी) त्यांच्या अधिकृत भारतीय कंपनीची नोंदणी केली आहे. कंपनीने नोंदणी करताना आरओसीकडे अधिकृत भारतीय भांडवल 15 लाख रुपये आणि एक लाख रुपये पेड-अप भांडवल भरले आहेत. सिटी सेंटरमध्ये विभव तनेजासह टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी लिमिटेड या नावाने कंपनी सुरु करण्यात आली आहे. वेंकटरंगम श्रीराम आणि डेव्हिड जॉन फाइन्स्टाईन यां कंपनीचे संचालक असतील.

टेस्ला इंडियाचे तनेजा मुख्य लेखा अधिकारी आहेत, तर फाइन्स्टाईन टेस्लामध्ये वरिष्ठ संचालक (ग्लोबल ट्रेड न्यू मार्केट) आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी ट्वीट केले आहे की, लवकरच भारतात टेस्ला उत्पादन सुरु करणार आहे. कंपनी त्यासाठी बंगळुरू येथे संशोधन आणि विकास (आर अँड डी) केंद्र सुरू करीत आहे. दरम्यान, बंगळुरुत टेस्लाला आमंत्रित करण्यासाठी कर्नाटक सरकारने जोरदार प्रयत्न केले होते.

याबाबत येडियुरप्पा यांनी एक ट्विट केले आहे, त्यांनी त्यात म्हटले आहे की, भारताचा ग्रीन मोबिलिटीच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे आणि या प्रवासाचे नेतृत्व कर्नाटक करणार आहे. टेस्ला लवकरच इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी बंगळुरुत एका आर अँड डी युनिटसह कामाला सुरुवात करणार आहे. एलन मस्क यांचे मी भारतात आणि कर्नाटकात स्वागत करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. टेस्ला कंपनी भारतात उत्पादन करण्यासाठी महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश यांसारख्या इतर राज्य सरकारांशी संपर्क साधत आहे.

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी एक ट्वीट करुन टेस्लाच्या भारतातील एंट्रीबाबत माहिती दिली होती. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते की, 2021 मध्ये टेस्ला कंपनी भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. एका ट्विटला दिलेल्या उत्तरात मस्क यांनी म्हटले होते की, निश्चितपणे आमची कंपनी पुढील वर्षात भारतात प्रवेश करेल.