हेलिकॉप्टरमधून मोदींनी टिपले चेन्नई कसोटी सामन्याचे दृश्य


चेन्नई : आज चेन्नईच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर चेन्नईला पोहोचताना एम.ए. चिदंबरम स्टेडियमजवळून उडत असताना हवेतूनच त्यांनी भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे दृश्य टिपले. आपल्या ट्विटर हँडलवर मोदींनी स्टेडियमचे चित्र तात्काळ शेअरही केले. क्रिकेटपटू या फोटो पांढऱ्या पोशाखात दिसत आहेत. पंतप्रधानांनी ट्विट करताना लिहिले की, या मजेदार सामन्याचे दृश्य त्यांनी आकाशातून पाहिले.


रविवारी पंतप्रधान मोदी तामिळनाडूच्या दौऱ्यावर होते. त्यांनी तेथे राज्यासाठी अनेक विकास प्रकल्पांची घोषणा केली. आयआयटी मद्रासच्या डिस्कवरी कॅम्पसची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पायाभरणी केली. चेन्नईजवळील थियूर येथे हा परिसर तयार केला जाईल. या कॅम्पसच्या पहिल्या टप्प्यातील सुमारे 2 लाख चौरस मीटर क्षेत्रामधील बांधकामासाठी 1000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेतय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईतील मेट्रो रेल फेज -1 विस्ताराचे उद्घाटन केले आणि वॉशरमेनपेट ते विमकोनगरपर्यंत प्रवाशांच्या सेवेस हिरवा झेंडा दाखवला. त्यांनी यासह चेन्नईमध्ये 293.40 कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या ‘चेन्नई बीच आणि अट्टीपट्टूदरम्यानच्या चौथ्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन केले.