घरबसल्या हवे असेल ड्रायव्हिंग लायसन्स तर द्यावी लागतील 6 प्रश्नांची उत्तरे


नवी दिल्ली : आपण जर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, राजस्थान, दिल्ली एनसीआर किंवा झारखंड या राज्याचे नागरिक असाल तर अगदी सोप्या मार्गाने आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी या राज्यांमध्ये राहणारे लोक ऑनलाइन अर्ज करू शकतात. तुम्हाला त्यासाठी फक्त परिवहन मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल आणि फॉर्मसह मागितलेले कागदपत्र अपलोड करावे लागतील.

यासह, टेस्टसाठी आपण आपला एक स्लॉट देखील बुक करू शकता. अर्जदारास स्लॉट बुक झाल्यानंतर परीक्षेसाठी तारीख मिळेल, जी तुम्ही सोयीनुसार निवडू शकता. नवीन प्रक्रियेअंतर्गत स्लॉट बुक केल्यानंतर अर्जदाराला ऑनलाईन ड्रायव्हिंग परवान्यासाठी फी जमा करावी लागेल. त्यानंतर अर्जदार त्यांच्या सोयीनुसार परवाना परीक्षेची तारीख निवडू शकतात. ऑनलाईन फी जमा करण्याचा गेटवे वेबसाइटवरच उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

प्रथम लर्निंग लायसन्स अर्जदारास दिले जाते, अर्जदारास त्यापूर्वी ऑनलाईन परीक्षा द्यावी लागते. तुम्हाला यासाठी संबंधित परिवहन कार्यालयात ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल. या ऑनलाईन परीक्षेत एकूण 10 प्रश्न विचारले जातात आणि त्यांचे उत्तर अवघ्या 10 मिनिटांत द्यावे लागेल. 6 किंवा त्यापेक्षा जास्त 10 प्रश्नांची जे अर्जदार योग्य उत्तरे देतात त्यांना चाचणी उत्तीर्ण मानले जाते. ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाणपत्र अर्जदाराच्या मेल आयडीवर पाठविले जाते. या प्रमाणपत्रांची प्रत आपण कोठूनही घेऊ शकता.

देशातील नवीन मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय वाहन चालविताना पकडल्यास 5000 रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो, जो आधी फक्त 1 हजार रुपये होता.