जे दिशा सालियनच्या बाबतीत घडले तेच पूजा चव्हाणच्या विषयात घडत असेल तर…


सिंधुदुर्ग : घराच्या बाल्कनीमधून पडुन पूजा चव्हाण या २२ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला होता. माध्यमांद्वारे या मुलीचे काही कॉल रेकॉर्डींग प्रसिद्ध करण्यात आले होते. पूजाने महाविकास आघाडीतल्या एका मंत्र्यांच्या दबावातून जीवन संपवल्याचा संशय त्यावरुन भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपकडून या प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांचे नाव घेत तक्रार करण्यात आली आहे. त्याचबरोबर पूजा चव्हाण यांच्या संवादाच्या ऑडिओ क्लिप्सही पोलिसांकडे दिल्या असल्याचेही विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


याप्रकरणी भाष्य करत भाजप नेते निलेश राणे यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले आहेत. जे दिशा सालियनच्या बाबतीत घडले तेच पूजा चव्हाणच्या विषयात घडत आहे. पुरावेच जर नष्ट केले जातील तर आरोपीला कधीच शिक्षा होऊ शकत नाही. कोणाचा जीव घेऊन सुद्धा जर हे हरामखोर मंत्रिपदे मिरवणार असतील तर पोलीस स्टेशन आणि कोर्ट बंद करून टाका, असा घणाघात निलेश राणे यांनी केला आहे.