शायराना अंदाजात जितेंद्र आव्हाडाकडून गोपींचंद पडळकरांना लक्ष्य


पुणे – राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी जेजुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार होते. पण तत्पूर्वी पवारांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यावर आक्षेप घेत शुक्रवारी पहाटे ५ वाजताच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी गडावर जाऊन पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकर यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका आणि संताप व्यक्त करण्यात आला. पडळकर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना, शरद पवारांवर टीका देखील केली. त्यामुळे, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पडळकरांवर बोचरी टीका केली.


शरद पवारांसारख्या भ्रष्ट नेत्याने अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करावे हा अहिल्यादेवींचा अपमान असल्याचे विधान पडळकरांनी केल्यानंतर गोपीचंद पडळकर आणि कार्यकर्ते यांनी पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी जेजुरी गडावर गोंधळ घातला, परंतु पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर हा वाद तात्काळ मिटला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला आहे. आव्हाड यांनी शायरीतून पडळकरांना कुत्ते भोकते है… असे म्हटले आहे.

तजुर्बे ने शेरों को खामोश रहना सिखाया;
क्योंकि दहाड़ कर शिकार नहीं किया जाता;
कुत्ते भोंकते हैं अपने जिंदा होने का एहसास दिलाने के लिए;
मगऱ जंगल का सन्नाटा शेर की मौजूदगी बंयाँ करता है।, असे म्हणत गोपीचंद पडळकरांना जितेंद्र आव्हाड यांनी कुत्र्याची उमपा दिली आहे.