याला म्हणतात नशीब! मालकाने आठ वर्षाच्या कुत्र्याच्या नावावर ठेवले ५० लाख डॉलर्स


न्युयॉर्क – आतापर्यंत माणसांना वडिलोपार्जित किंवा वारसा हक्काने कोट्यावधी रुपयांची संपत्ती मिळाल्याचे किंवा त्यासाठी भांडणे झाल्याचे आपण ऐकले असले. पण ज्याच्यासोबत रक्ताचे नाते नाही तरीदेखील त्या व्यक्तीवरील प्रेमापोटी एखादी व्यक्ती मृत्यूपत्रात कोट्यावधीची तरतूद करुन ठेवतो, असे कधी तुम्ही ऐकले आहे का. पण असेच भाग्य अमेरिकेत एका कुत्र्याच्या वाट्याला आले आहे. चक्क कुत्र्याच्या नावावर अमेरिकेतील एका व्यक्तीने ५० लाख डॉलर्स ठेवले आहेत.

ही बाब या व्यक्तीच्या निधनानंतर मृत्यूपत्रातून समोर आली आहे. या कुत्र्याचे नाव लुलु असे असून एवढी मोठी रक्कम बॉर्डर कोली प्रकारात मोडणाऱ्या लुलुच्या नावावर मालकाने ठेवल्यामुळे इंटरनटेवर आठ वर्षाचा लुलु व्हायरल झाला आहे. मागच्यावर्षी अमेरिकन नॅशविले येथे राहणाऱ्या बिल डॉरीस यांचा मृत्यू झाला.

बिल यांनी मृत्यूपत्रात ट्रस्टकडे लुलुच्या नावावर ठेवलेले पैसे ट्रान्सफर करावे, जेणेकरुन त्याच्या देखभालीसाठी या पैशांचा वापर करता येईल, असे नमूद करुन ठेवले आहे. लुलुला आपली मैत्रिण मार्था बरटॉन यांच्याकडे बिल यांनी सोपवले आहे. मार्था लुलुची व्यवस्थित काळजी घेतील, असा त्यांना विश्वास आहे. लुलुच्या देखभालीसाठी मार्था यांना दर महिन्यांना पुरेसे पैसे द्यावेत, असे मृत्यूपत्रात म्हटले आहे. बिल डॉरीस यांच्याकडे किती संपत्ती आहे, ते अजून स्पष्ट झालेले नाही. पण द
न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, बिल यांच्याकडे प्रचंड संपत्ती असून त्यांनी चांगली गुंतवणूक सुद्धा करुन ठेवली आहे.