रेल्वे प्रवासादरम्यान तुमचे सामान चोरीला गेल्यास त्याची जबाबदारी ही रेल्वेचीच असणार आहे


नवी दिल्ली : तुमचे सामान जर रेल्वे प्रवासादरम्यान चोरीला गेले तर त्याची जबाबदारी ही रेल्वेचीच असणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातील दाखल झालेल्या याचिकेत हा निकाल दिला आहे.

त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाने दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे महिला प्रवाशाला रेल्वेकडून 1 लाख 33 हजारांची मिळाली नुकसान भरपाई मिळणार आहे. न्यायमूर्ती डी. व्हाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने राष्ट्रीय ग्राहक आयोगाचा आदेश ठेवला कायम ठेवत रल्वेला ही भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत.

एका महिलेचे सामान दिल्ली ते सिकंदराबाद प्रवासादरम्यान चोरीला गेल्या. तक्रारदार महिलेला रेल्वे प्रवासादरम्यान सीटखाली सामान बांधून ठेवायचे होते. पण साखळी उपलब्ध नव्हती. तसेच तिकीट नसणारे अनेक प्रवासी डब्यातून प्रवास करत होते. ऑन ड्युटी असलेले रेल्वे पोलीस फुकट्या प्रवाशांना रोखताना दिसत नसल्यामुळे चोरी झाली, असा दावा या महिलेने केला आणि तो सर्वोच्च न्यायालयात ग्राह्य धरण्यात आला.

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी भारतीय रेल्वे प्रशासनाने दाखल केलेली एक याचिका फेटाळली आहे. राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या एका आदेशाविरोधात रेल्वेने ही याचिका दाखल केली होती. प्रवाशाच्या चोरीला गेलेल्या सामानाची भरपाई देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने रेल्वेला दिले होते. आयोगाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला आहे. त्याबद्दल एक लाख 33 हजार रुपयांची भरपाई रेल्वेने महिलेला देण्याचे आदेश ग्राहक आयोगाने दिले होते.