घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा विवाहबद्ध होणार दिया मिर्झा


लवकरच पुन्हा एकदा बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा विवाहबद्ध होणार आहे. दिया मिर्झा वैभव रेखी या बिझनेसमन मित्रासोबत विवाह बंधनात अडकणार आहे. हा विवाहसोहळा येत्या १५ फेब्रुवीराला पार पडणार आहे. हे लग्न निवडक मित्र परिवाराच्या उपस्थितीत होणार आहे. दिया मागच्या वर्षापासून वैभव रेखीला डेट करत असल्याची चर्चा होती. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.

दियाचे हे दुसरे लग्न असून दियाचे यापूर्वी उद्योगपती साहिल संघा बरोबर लग्न झाले होते. पण ऑगस्ट २०१९ मध्ये लग्नाच्या पाच वर्षानंतर दिया आणि साहिल विभक्त झाले. दिया मिर्झा आणि वैभव रेखी येत्या १५ फेब्रुवारीला विवाहबद्ध होतील. घरच्या घरी हे लग्न अत्यंत साधेपणाने होईल, असे माध्यमांनी म्हटले आहे. या विवाह सोहळयाला फार निवडक लोक उपस्थित असतील. दिया आणि वैभव मागच्या वर्षी परस्परांना डेट करत होते. आता त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.

दिया मिर्झा आणि साहिल संघाने ऑगस्ट २०१९ मध्ये सोशल मीडियावरुन विभक्त होत असल्याचे जाहीर केले होते. ऑक्टोबर २०१४ मध्ये ते विवाहबद्ध झाले होते. आमच्यात मैत्रीचे नाते कायम राहिल, असे त्यांनी म्हटले होते. माझे प्रोफेशन एक सेलिब्रिटी असल्यामुळे मला दु:खी राहण्याची परवानगी देत नाही आणि हे दु:ख सहन करण्याची ताकद मला माझ्या आई-वडिलांकडून मिळाली आहे. मी चार वर्षांची असताना माझे आई-वडील विभक्त झाले. या घटनेला आज ३४ वर्षे झाली. जर चार वर्षांची असताना मी हे दु:ख सहन करु शकते, तर वयाच्या ३७ व्या वर्षी का नाही? असे दिया त्यावेळी म्हणाली होती.