सीरम इंस्टिट्यूटमधील आगीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले कारण


पुणे – पुण्यातील मांजरी परिसरात असलेल्या आणि कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती करत असलेल्या सीरम इंस्टि्टयूट ऑफ इंडिया (SII)मध्ये लागलेल्या आगीच्या घटनेचा तपास पूर्ण झाला असून शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागल्याची माहिती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

शुक्रवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी सांगितले की, सीरमच्या ज्या इमारतीमध्ये आग लागली होती, तिथे काम सुरू होते. यावेळी शॉर्ट सक्रिटमुळे ही आग लागली आहे. कोरोना लस तयार करणाऱ्या पुण्यातील सीरम इंस्टिट्यूटमधील एका इमारतीला 21 जानेवारीला मोठी आग लागली होती. या आगीत पाच कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेनंतर चौकशीचे आदेश दिले होते. सीरमच्या पुण्यातील प्लँटमध्ये ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाची कोव्हीशील्ड व्हॅक्सीन तयार केली जात आहे. परंतु, या दुर्घटनेत कोरोना व्हॅक्सिनचे नुकसान झाले नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले होते.