आता मध्यरात्रीपर्यंत सुरू राहणार पुण्यातील हॉटेल


पुणे : मध्यरात्री एकपर्यंत पुण्यातील रेस्टॉरंट्स, बार आणि फुड कोर्ट सुरु ठेवण्याला परवानगी देण्यात आली आहे. सध्याचे निर्बंध शिथिल करणारे आदेश पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी काढले आहेत. ही सुट देण्यात येणार असल्याचे त्यामध्ये जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर रात्री साडे दहापर्यंत मद्यविक्री साठीही परवानगी देण्यात आली आहे.

शहरातील हॉटेल्स कोरोनाच्या पार्श्वभुमीवर रात्री ११ वाजता बंद केले जात होते. लवकर बंद करायचे आदेश असल्याने अनेक हॉटेल्समध्ये ग्राहकांना १०:३० पर्यंतच सेवा दिली जात होती. पण आता रात्री १ पर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे

पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या हळूहळू कमी होऊ लागताच टाळेबंदी टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला अटीसापेक्ष मर्यादित वेळेत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर हॉटेल्सही मर्यादित वेळेसाठी खुली करण्यात आली.

एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारने २९ जानेवारी २०२१ रोजी दुकाने आणि उपाहारगृहांच्या वेळा निश्चित केल्या. राज्य सरकारच्या या आदेशांचा आधार घेत इक्बालसिंह चहल यांनी परिपत्रक जारी करून मुंबईतील हॉटेल्स, रेस्तरॉ, मद्यालये, फूड कोर्ट सकाळी ७ ते रात्री १ या कालावधीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.