ट्विटर सोडून स्वदेशी कूवर दाखल होणार कंगना


अभिनेत्री कंगना राणावत ट्विटरच्या माध्यमातून नेहमी आपले रोखठोक मत मांडत असते. पण यामुळे मोठे वाद अनेकदा निर्माण झाले असून अनेकावेळा तिला टीकेचाही सामना करावा लागला आहे. कंगनाकडून ट्विटरवर वापरण्यात येणाऱ्या भाषेवरही अनेकदा नेटकरी आक्षेप घेत असतात. कंगनावर फक्त सर्वसामान्याच नाही तर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी टीका करत असतात. कंगनाच्या अनेक ट्विट्सवर नियमांचं उल्लंघन केल्याचा आक्षेप घेत कारवाईदेखील झाली आहे. त्यातच आता कंगनाने मोठा निर्णय घेतला आहे.

आपण ट्विटर सोडणार असल्याचे कंगनाने ट्विट करत जाहीर केले आहे. आता ट्विटर तुझी वेळ संपली असल्याचे म्हणत कंगनाने koo app वर शिफ्ट होणार असल्याची माहिती ट्विट करत दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये कंगनाने म्हटले आहे की, आता ट्विटर तुझी वेळ संपली असून #kooapp वर शिफ्ट होण्याची वेळ आली आहे. यासंबंधीची माहिती लवकरच सर्वांना देईल. आपल्याकडेच तयार करण्यात आलेल्या koo app चा अनुभव घेण्यास उत्सुक आहे.