संघ निवडीत मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा क्रिकेटपटू वासिम जाफर याच्यावर आरोप


नवी दिल्ली – अलीकडेच उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा भारताचे माजी क्रिकेटपटू वासिम जाफरने राजीनामा दिला. वासिम जाफरने हे पाऊल उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर झालेल्या वादानंतर उचलले. वासिम जाफर याच्यावर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. बुधवारी हा आरोप वासिम जाफरने फेटाळून लावला.

उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव माहिम वर्मा यांनी मीडियामधून, मी मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य देत असल्याचा आरोप माझ्यावर केला जात आहे. मला त्यांच्या या आरोपामुळे प्रचंड दु:ख झाल्याचे वासिम जाफरने सांगितले. भारतासाठी ४२ वर्षीय वासिम जाफरने ३१ कसोटी सामने खेळले आहेत. वासिम जाफर हे देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक मोठे नाव आहे.

मंगळवारी उत्तराखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा वासिम जाफर यांनी राजीनामा दिला. त्याने राजीनामा देताना हस्तक्षेप आणि पक्षपाती निवडसमिती ही कारणे दिली. जातीयवादाचा अँगल संघ निवडीत आणणे, हे खूप दु:खद असल्याचे वासिम जाफर पत्रकार परिषदेत म्हणाला.

मी इक्बाल अब्दुल्लाला संघ निवडीमध्ये प्राधान्य देत आहे. मला इक्बालला संघाचे कर्णधार बनवायचे होते, हे माझ्यावर करण्यात आलेले आरोप पूर्णपणे निराधार, चुकीचे असल्याचे जाफर म्हणाला. पण जय बिस्ताला मला कर्णधार बनवायचे होते. पण रिझवान शमसाद आणि निवड समितीच्या अन्य सदस्यांनी इक्बालला कर्णधार बनवण्याचा पर्याय सुचवला. तो संघातील वरिष्ठ खेळाडू आहे. त्याला आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव असल्यामुळे मी त्यांच्या सल्ल्याशी सहमत झाल्याचे वासिम जाफरने सांगितले.

आपल्या फलंदाजीने रणजी करंडक स्पर्धेत दबदबा निर्माण करणाऱ्या वासिम जाफरने संघाच्या प्रशिक्षणा दरम्यान मौलवींना आणल्याचा आरोपही फेटाळून लावला. डेहराडूनला शिबिर असताना दोन ते तीन शुक्रवार मौलवी आले होते. पण त्यांना मी बोलावले नव्हते. इक्बाल अब्दुल्लाने शुक्रवारच्या प्रार्थनेसाठी माझी आणि संघाच्या व्यवस्थापकांची परवानगी घेतली असल्याचे जाफर म्हणाले. संघाच्या प्रशिक्षणानंतर प्रार्थना करण्यात आल्यामुळे याला मुद्दा का बनवला जात आहे, ते समजत नसल्याचे जाफर म्हणाला.