भाजप खासदार सुशील मोदींनी राज्यसभेत सांगितला नरेंद्र मोदी नावाचा पूर्ण अर्थ


नवी दिल्ली – भाजप खासदार सुशील मोदी यांनी राज्यसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा पूर्ण अर्थ सांगितला. त्याचबरोबर संसदेत भाषण करताना बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार सुशील मोदी विरोधकांना टोला लगावला.
सुशील मोदींनी असा सांगितला नरेंद्र मोदी नावाचा पूर्ण अर्थ

N- New India

A- Aatm Nirbhar Bharat

R- Ready for reforms

E- Electronic Agri market

N- New Financial Structure

D- Disinvestment

R- Railway and roads

A- Agriculture Reforms

M- MSP assured, Helping migrant worker

O – One person company

D- Down to earth

I- Inclusive development

नरेंद्र मोदींचे सुशील मोदी यांनी भाषणात खूप कौतुक केले. सुशील मोदी म्हणाले की, अर्थव्यवस्थेच्या नुकसानीतून देश पुन्हा सावरू शकतो, पण आयुष्य गेले तर पुन्हा परत आणू शकत नसल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. महाभारताच्या शांतिपर्वात म्हटले आहे की, आपदाग्रस्त जीव प्राण रक्षा ही धर्म है, याच गोष्टीचे केंद्र सरकार पालन करते, कोरोना संकटकाळात अनेक लोकांची मदत केली गेली, असे ते म्हणाले.

तसेच शेअर मार्केटनेही केंद्राने मांडलेल्या अर्थसंकल्पाचे स्वागत केले, सर्वाधिक ५१ हजारपर्यंत सेन्सेक्स वधारले होते, २३ वर्षानंतरही असे झाले, तत्कालीन अर्थमंत्री पी. चिंदबरम यांच्या १९९७ मधील भाषणानंतर सेन्सेक्सने शिखर गाठले होते, त्याचसोबत मागील २५-३० वर्ष बजेट पाहतो आहे. कोणीही यंदाच्या अर्थसंकल्पावर टीका केली नाही. देशाने स्वागत केले. लॉकडाऊन काळात मोदी सरकारने ८० कोटी गरिबांना ४० किलो धान्य आणि ८ किलो डाळ दर महिन्याला दिली. २० कोटी महिलांचे जनधन खाते उघडण्यात आले. ७ कोटींहून अधिक महिलांना उज्ज्वला कनेक्शनअंतर्गत गॅस सिलेंडर दिल्याचेही सुनील मोदींनी सांगितले.

या योजनांचा अमेरिकेत थेट फायदा होत नव्हता, ८ कोटी लोकांचे चेक प्रिंट केल्यानंतर ट्रम्प यांनी सही केली आणि पुढील ४ महिनेही त्या चेकचे वाटप करता, आले नाही. तर दुसरीकडे भारतातील लोकांना लाभ थेट त्यांच्या जनधन खात्यात वेळोवेळी मिळत होता. त्याशिवाय लॉकडाऊन काळात मोदी सरकारने केलेल्या कामाचे कौतुक सुशील मोदींनी राज्यसभेत केले.