नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या सुपरहिट चित्रपटातून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ती कायम ऑनलाईन पोस्ट, फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून चर्चेत असते. ती यावेळी देखील अशाच एका ग्लॅमरस फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे. रिंकू उर्फ आर्चीच्या या फोटोवर चाहत्यांनी कॉमेंट्सचा अक्षरश: पाऊस पाडला आहे.
आर्चीच्या नव्या लुकने पुन्हा लावलं याड !
रिंकूने लोभ नियंत्रणात ठेवणे हिच खरी संपत्ती असल्याचे म्हणत आपला फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. तिचे या फोटोमधील सौंदर्य पाहून चाहते सैराट झाले आहेत. हजारो नेटकऱ्यांनी काही तासांत रिंकूच्या फोटोवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सध्या सोशल मीडियावर हे फोटो जोरदार व्हायरल होत आहेत.
अवघ्या महाराष्ट्राला सैराट चित्रपटातून नावारुपास आलेल्या आर्चीने ‘याड’ लावले आहे. ती तिच्या अभिनयामुळे स्टार झाली. महाराष्ट्रात बुलेट चालवणाऱ्या आर्चीची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळत आहे. तिला सैराटसाठी राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरवण्यात आले. रिंकू सैराटच्या यशानंतर भरपूर चित्रपटांमध्ये काम करेल असेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती, पण तिने सध्या आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिले आहे. ती हल्ली आपली शैक्षणिक जबाबदारी सांभाळून चाहत्यांचे मनोरंजन करताना दिसते.