प्रियंका चोप्राचा खळबळजनक गौप्यस्फोट; एका दिग्दर्शकाने दिला होता Boob Job चा सल्ला


आज भारतातील ग्लोबल आयकॉन कलाकारांमध्ये बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा हिचा समावेश होतो. प्रियंकासाठीही हा प्रवास अन्य कलाकारांप्रमाणे खडतर होता. प्रियंकाने आजच आपल्या जीवनावर आधारित एक पुस्तक ‘Unfinished’ प्रकाशित केले. प्रियंकाने तिच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या घटनांचा उल्लेख या पुस्तकात केला आहे.

एक खळबळजनक खुलासा या पुस्तकातून प्रियंकाने केला असून ‘बूब जॉब’चा सल्ला एका दिग्दर्शकाने दिल्याचे सांगितले आहे. त्या दिग्दर्शकाच्या नावाचा प्रियंकाने कुठेही खुलासा केलेला नाही. पण ‘हिंट’ मात्र दिली आहे. वर्ष २००० मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा खिताब जिंकल्यानंतर ज्या दिग्दर्शकासोबत पहिली भेट झाली त्यांनी ‘बूब जॉब’चा सल्ला दिल्याचे प्रियंकाने म्हटले आहे.

त्या दिग्दर्शकाने शारीरिक ठेवण योग्य पद्धतीने व्हावी, यासाठी तुला ‘बूब जॉब’ची गरज असल्याचे म्हटले होते, असे प्रियंकाने नमूद केले आहे. इंडिपेंडेंटने दिलेल्या रिपोर्टनुसार, आपल्या पुस्तकात प्रियंकाने लिहिले आहे की, काही मिनिटांच्या चर्चेनंतर दिग्दर्शकाने तिला उभे राहायला आणि वळायला सांगितले.

डायरेक्टरने सांगितल्याप्रमाणे केल्यानंतर त्याने तिच्याकडे बघून तुला ‘बूब जॉब’ची गरज आहे, जेणेकरुन तुझी शारीरिक ठेवण योग्य आणि आधीपेक्षा उत्तम होईल, असे म्हटले. प्रियंकाने पुस्तकात खुलासा केला आहे की, डायरेक्टरसोबत झालेल्या त्या काही मिनिटांच्या मिटिंगनंतर आपण खूप हैराण झालो आणि स्वतःला कमी लेखायला लागली.

या पुस्तकात प्रियंकाने असेही म्हटले आहे की, तिला करियरमध्ये तिच्या बॉडीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि सुरू होण्याआधीच सगळे संपते की काय अशी भीती वाटत होती. प्रियंकाकडे सध्या हॉलिवूडचे दोन चित्रपट आहेत. ती लवकरच ‘Text For You’ चित्रपटात दिसेल, याशिवाय ती ‘Matrix 4’ चित्रपटातही काम करत आहे.