अमित शहांनी केलेल्या आरोपानंतर शिवसेना पक्षप्रमुखांचे शिवसैनिकांना भावनिक पत्र


मुंबई – शिवसेना आणि भाजपमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. अमित शहा सिंधुदुर्गात नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्धाटनासाठी आले होते. त्यांनी यावेळी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांच्या आरोपांनंतर शिवसैनिकांना भावनिक पत्र लिहिले आहे.

उद्धव ठाकरे यांनी पत्रामध्ये नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणेंच्या कार्यक्रमात शिवसेना संपविण्याचा गृहमंत्रीपदी असणाऱ्या अमित शहा यांनी केलेला उल्लेख केलेला ऐकून नारायण राणेंना सुद्धा हसू आवरले नसेल. गेल्या १५ वर्षांपासून शिवसेना संपविण्याचा विडा नारायण राणेंनी उचलला होता. पण त्यांना जमले नाही. म्हणून त्यांनी अमित शहा यांना बोलावून शिवसेना संपविण्याची सुपारी दिल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटले आहे.

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात येऊन गुजराती माणूस, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपविण्याचे वाक्य बोलतो आणि नारायण राणे सकट कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण मराठी जण या वाक्यावर टाळ्या वाजवण्यासारखे मराठी माणसाचे दुसरे दुर्दैव नसेल, अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.