बिटकॉइनमध्ये टेस्लाची 1.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक


वॉशिंग्टन : बिटकॉइनमध्ये 1.5 अब्ज डॉलर्स एवढी प्रचंड गुंतवणूक टेस्लाचे संस्थापक एलन मस्क यांनी केली आहे. बिटकॉइनच्या किंमतीने या गुंतवणुकीमुळे नवा विक्रम प्रस्थापित केला असून त्याची किंमत सोमवारी 43,000 डॉलर्स एवढी वाढली आहे. एका बिटकॉइनची किंमत भारतीय रुपयात सांगायचे तर 34 लाखांच्या जवळ पोहचली आहे.

बिटकॉइनच्या किंमतीत कोरोनाच्या काळात प्रचंड वाढ पहायला मिळाली आहे. या वर्षाच्या सुरुवातीचा विचार करता बिटकॉइनच्या किंमतीत आता 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. बिटकॉइनच्या किंमतीमध्ये टेस्लाच्या या महाप्रचंड गुंतवणुकीनंतर 14 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

आपल्या इलेक्ट्रिक कार निर्मितीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या टेस्ला कंपनीच्या वतीने सोमवारी सांगण्यात आले की बिटकॉइनमध्ये त्यांनी 1.5 अब्ज कोटी डॉलर्स एवढी गुंतवणूक केली आहे. एलन मस्कने सांगितले की भविष्यात ते टेस्लाच्या उत्पादने आणि कार खरेदी करणाऱ्यांसाठी बिटकॉइनच्या स्वरुपात पैसे स्वीकारु शकतात. यानंतर बिटकॉइनच्या किंमतीत उसळी पहायला मिळाली. टेस्लाच्या या निवेदनानंतर बिटकॉइनच्या किंमतीमध्ये 14 टक्क्यांची वाढ पहायला मिळाली.